डुडलने केल्या दिलीप सरदेसाई यांच्या आठवणी जाग्या …

भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाज  दिलीप सरदेसाई यांच्या कार्याची दखल घेत डुडलने आज त्यांच्या जन्मदिनी ८ ऑगस्ट रोजी डुडल प्रसिद्ध केले आहे. त्यांनी भारतासाठी डिसेंबर १९६१ मध्ये पदार्पण केले होते. १९६५ मुंबई बेब्रॉन स्टेडियमवर खेळताना त्यांनी न्यूझीलँड २०० धावांची पहिली द्विशतकी खेळी केली होती आणि नंतर याच मालिकेमध्ये फिरोजशाह कोटलावर १०६ धावांची खेळी केली होती.

दिलीप सरदेसाई यांना जागतिक स्तरावर मोठ्या उंचीवर नेणारा दौरा ठरला तो म्हणजे १९७१ सालचा वेस्ट इंडीज दौरा. या दौऱ्यात त्यांनी २१२ धावांची आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या केली. त्याचबरोबर भारताने वेस्ट इंडीजला प्रथम हरवले त्या कसोटीत त्यांनी ११२ धावांची खेळी आणि अन्य कसोटीमध्ये १५० धावांची खेळी करत मालिकेत ६४२ धावा करून तो दौरा गाजवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आग ओकणाऱ्या वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीत पिसे काढण्याची ही भारतीय फलंदाजाकडून होत असणारी पहिलीच कामगिरी होती. दिलीप सरदेसाई यांनी  आपल्या कारकिर्दीत ३० कसोटी सामने खेळताना २००१ धाव केल्या. त्यात त्यांच्या दोन द्विशतकांसह पाच शतकांचा तर नऊ अर्धशतकांचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)