चीन-पाकिस्तान दोन्ही आघाड्यांवर चांगले काम : लष्करप्रमुख बिपीन रावत

लष्करात कोणत्याही व्यभिचाराला थारा नाही

नवी दिल्ली: कलम 377मध्ये बदल केल्याने आता समलैंगिक संबंध ठेवणे गुन्हा ठरणार नाही. पण लष्करासाठी मात्र हा कायदा बदलाने काही फरक पडणार नाही. भारतीय लष्कर कॉन्झर्वेटिव्ह असून इथे कुणालाच व्यभिचारास थारा दिला जाणार नाही, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले आहे. तसेच चीन आणि पाकिस्तान दोन्ही आघाड्यांवर आम्ही चांगले काम केले आहे. सौम्य आणि सक्ती असे दुहेरी धोरण अवलंबले असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी गुरुवारी (10 जानेवारी) वार्षिक पत्रकार परिषदेत पाकिस्तान-चीन सीमा, दहशतवाद, काश्‍मीर अशा अनेक मुद्द्यांबाबत चर्चा केली. या परिषदेतला एक मुद्दा भारतीय दंडविधान कलम 377 चाही होता. रावत म्हणाले, जम्मू-काश्‍मीरमधील स्थितीत आणखी सुधारणा होऊ शकते. चकमकीवेळी आम्ही सामान्य नागरिकांना जाणूनबुजून लक्ष्य करत नाही. पण आम्हाला हेही माहीत आहे की, त्या जमिनीवर दहशतवादी आहेत. तसेच किती दहशतवादी मारले गेले यावर यश ठरत नाही. जर एक दहशतवादी मारला गेला, तर नवीन दहशतवादी तयार होतो. आम्हाला हेच रोखायचे आहे, कारण आम्हाला शांतता हवी, असेही रावत यांनी म्हटले.

वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीवर ते म्हणाले की, जर कोणी सीमारेषेवर आले तर गोळीबार सुरू होतो. यामुळेच शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे आम्ही आता तिथे ड्रोनचा वापर करत आहोत.अफगाणिस्तान प्रकरणी ते म्हणाले की, जर अफगाणिस्तानमध्ये आपले काही हित नसेल तर तिथे आपण राहणे योग्य नाही. पण अफगाणिस्तानमध्ये आपले हित आहे. त्यामुळे जर कोणी तिसरा व्यक्ती काही बोलू इच्छितो तर आपण त्याला वेगळे करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)