सलमान खानच्या चाहत्यांसाठी खुशखबरी

सलमान खानच्या चाहत्यांना त्याच्या आगामी “भारत’ चित्रपटाची खूपच प्रतिक्षा आहे. या चित्रपटाचा टीझर सुपरहिट ठरल्यानंतर प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखीन वाढली आहे. आता दबंग खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदची बातमी आहे. ती म्हणजे, “भारत’ चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख निश्‍चित करण्यात आली आहे.

चित्रपट निर्माता अली अब्बास जफर यांनी ट्विटर अकाउंट याबाबत माहिती देताना ट्विट केले की, “भारत’चा ट्रेलर लॉक करण्यात आला आहे. आम्ही पोस्ट प्रॉडक्‍शनच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. तो एप्रिल महिन्याच्या तिस-या आठवडयात प्रदर्शित करण्यात येईल. या चित्रपट खूपच स्पेशल असून मी खूपच उत्साहित आहे, असे म्हटले आहे.

“भारत’च्या टिझरमध्ये फक्‍त सलमान खानची झलक दाखविण्यात आली होती. आता ट्रेलरमध्ये चित्रपटातील अन्य मुख्य कलाकार कतरिना कैफ, तब्बू, दिशा पाटणी, सुनील ग्रोवर, जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, आसिफ शेख आणि नोहा फतेही आदींची झलक दर्शकांना पाहण्यास मिळू शकते.

दरम्यान, “भारत’ हा चित्रपट “ओड टू माय फादर’ या दक्षिण कोरियन चित्रपटाचा अधिकृत हिंदी रीमेक आहे. हा चित्रपट ईदच्या निमित्त देशभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)