करीना कपूरकडे ‘गुड न्यूज’…! अक्षय कुमारने ट्विटरवर केली पोस्ट

बाॅलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री करीना कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकसाथ दिसणार आहेत. यापूर्वी दोघेही ‘गब्बर इज बॅक’ या हिंदी चित्रपटात एकत्र दिसले होते. ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. अक्षय कुमार आणि करीना कपूर यांच्या या चित्रपटाचे नाव ‘गुड न्यूज’ असे आहे.

अक्षय कुमार याने त्याच्या आॅफिशिएल ट्विटर अकाउंटवर आपल्या चाहत्यासोबत गुड न्यूज अशी पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्याने लिहले आहे की, आमच्या चित्रपटाचे नाव ‘गुड न्यूज’ आहे, आणि ही बातमी मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे.  चित्रपट ‘ड्रामेडी’ आहे. चित्रपट हा 19 जुलै 2019 ला प्रदर्शित होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचबरोबर करण जोहर यानेही ट्विटरवर चित्रपटासंबंधी पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने या चित्रपटातील कलाकरांची नावाची माहिती दिली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, करीना कपूर यांच्यासह दिलजील दोसांझ आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता करणार असल्याचे देखील समजते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)