चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांसाठी उत्तम सुविधा द्याव्यात- मुख्यमंत्री

मुंबई: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे अभिवादन करण्यास येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना सर्व संबंधित विभागांमार्फत उत्तम सुविधा द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

या संदर्भात समन्वय समिती व सर्व संबंधित विभागांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारे विविध उपक्रम हे  समन्वय समिती व शासन यांच्यातील उत्तम समन्वय असल्याचे एक चांगले  उदाहरण आहे. चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची उत्तम व्यवस्था झालीच पाहिजे. यासाठी महानगरपालिकेच्या वतीने केलेले नियोजन उत्तम आहे. तथापि, त्यातील प्रत्येक घटकांची उजळणी व्हावी, तसेच भविष्यातील आव्हानांचादेखील विचार करुन योग्य ते नियोजन करावे. तसेच सदस्यांच्या वतीने देण्यात आलेल्या अधिकच्या सूचनांचाही विचार करुन त्याची यथायोग्य अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. पोलीस यंत्रणेमार्फतही उत्तम अशी नियंत्रण व्यवस्था राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

समन्वय समितीचे सरचिटणीस श्री. कांबळे यांनी आपल्या सविस्तर निवेदनातून बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट विभाग, पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सामाजिक न्याय विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तटरक्षक, रेल्वे, साप्रवि, नगरविकास विभाग आदींमार्फत अपेक्षित असलेल्या कार्यवाहीबाबत विनंती केली. तसेच आमदार भाई गिरकर, कालिदास कोळंबकर यांनीही आपले विचार मांडले.

या बैठकीस समन्वय समितीचे सदस्य सिद्धार्थ कासारे, मयुर कांबळे, ॲड. अभया सोनावणे तसेच सर्व संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)