गोल्फर ज्योती रंधावाला अवैध शिकारीप्रकरणी अटक

बहराईच (उत्तर प्रदेश): आंतरराष्ट्रीय गोल्फर ज्योती रंधावा याला अवैध शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशातून ज्योती रंधावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच शिकारीचे साहित्यही जप्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय गोल्फर म्हणून परिचित असलेला ज्योतींदर रंधावा अवनी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मदत म्हणून यवतमाळलाही आला होता.

ज्योती रंधावासोबत महेश विराजदारलाही मोतीपूर जवळील कतरनिया घाट येथून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती फिल्ड ऑफिसर रमेश पांडे यांनी दिली आहे. याप्रकरणी रंधवा यांच्यावरील पुढील कायदेशीर कारवाई कतरनिया घाटचे डीएफओ करतील, असेही त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कतरनिया घाट जंगलातील मोतीपूर फॉरेस्ट रेंजमध्ये त्यांनी ही अवैध शिकार केल्याचे उघड झाले आहे. वनविभागाकडून शिकारीसाठी वापरलेले वाहन, हत्यार आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ज्योती रंधावा अभिनेत्री चित्रांगदा सिंगचा पती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)