नवी दिल्ली – गुरुवारी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली बघायला मिळाली आहे. डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे करोनाच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकाराचा परिणाम सोन्याची मागणी आणि किंमतीवरही दिसून येत आहे.
MCX वर वायदा ट्रेडिंगमध्ये, सोने 0.22 टक्क्यांनी म्हणजेच 107 रुपयांनी वाढले आहे. या नवीन वाढीमुळे आज सोन्याचा भाव 48हजार 306 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे, जर आपण चांदीच्या किंमतीवर नजर टाकली तर चांदी 0.19 टक्क्यांनी म्हणजेच 109 रुपयांच्या वाढीसह 62 हजार 309 प्रतिकिलो झाली आहे.
डॉलरच्या कमजोरी व ओमायक्रॉनची भीती यामुळे जगभरातील आर्थिक विकासाचा वेग मंदावण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे.