महाराष्ट्राच्या मुलींची सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकाची कमाई

राष्ट्रीय रॅंकिंग टेबल टेनिस स्पर्धा

पुणे: महाराष्ट्राच्या मुलींनी राष्ट्रीय रॅंकिंग टेबल टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत (उत्तर विभाग) मुलींच्या ज्युनियर गटात एका सुवर्णासह तीन पदके पटकावून चमकदार कामगिरी केली. स्वस्तिका घोष, मनुश्री पाटील व दिया चितळे यांनी तीन पदकांची कमाई करत छाप पाडली.

हरयाणातील पंचकुला येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील ज्युनियर मुलींच्या अंतिम सामन्यात स्वस्तिकाने चुरशीच्या लढतीत मनुश्रीला 4-2 अशा फरकाने नमविताना सुवर्णपदक मिळवले. त्यापूर्वी तिने उपान्त्य फेरीत दिया चितळेला पराभूत केले होते. मनुश्री व दियाने अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली.यासोबतच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी इतर गटात चमकदार कामगिरी बजावताना आणखीन तीन कांस्यपदकाची कमाई केली.

पीएसपीबीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सनिल शेट्टीने पुरुष एकेरीतील उपांत्यपूर्वफेरीत अँथनी अमलराजचा 4-3 असा पराभव केला. मात्र त्याला उपान्त्य फेरीत मानव ठक्‍करकडून 2-4 असे पराभूत व्हावे लागले. महिला एकेरीत मधुरिका पाटकरला उपान्त्य फेरीत भारतातील सर्वोत्तम महिला खेळाडू मनिका बात्राकडून 1-4 असे पराभूत व्हावे लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच मुलींच्या यूथ गटात महाराष्ट्राच्या श्रुती अमृतेने आणखी एका कांस्यपदकाची कमाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)