नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे आणि स्थानिक दागिने उत्पादकांनी मागणी वाढविल्यामुळे भारतात सोन्याच्या दरात तब्बल 930 रुपयांची वाढ झाली. त्याचबरोबर चांदीच्या दरातही 300 रुपयांची वाढ नोंदली गेली. अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिल्ली सराफात शुद्ध सोन्याच्या दरात 930 रुपयांची वाढ होऊन या सोन्याचा दर 35,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर स्टॅण्डर्ड सोन्याच्या दरात 930 रुपयांची वाढ होऊन या सोन्याचा दर 35,630 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
त्याचबरोबर तयार चांदीचा दर 300 रुपयांनी वाढवून 39,200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही सोन्याचे दर जवळ जवळ एक टक्क्यांनी वाढले. व्यापारयुद्ध आणि चलनबाजारातील अस्थिरतेमुळे नजीकच्या भविष्यात धातू बाजारात अनिश्चितता रेंगाळणार आहे.