मुंबई – एकूण जागतिक परिस्थिती पाहता पुढील वर्षापर्यंत सोन्याच्या दरात 15 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता अधिक आहे असे जुलियस बेजर या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मार्क मॅथ्यूज यांनी म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आगामी वर्षात डॉलरचे दर फारसे वाढणार नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता असल्यामुळे सोन्याचे दर चढे राहतील.
रशिया, चीन, अमेरिका, युरोपदरम्यान विविध पातळ्यांवर व्यापारयुद्ध चालू आहे. त्यामुळे चलनातील अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे कोणीही डॉलरमध्ये जास्त गुंतवणूक करणार नाही. यामुळेच बऱ्याच देशांच्या रिझर्व्ह बॅंका आता सोन्यात गुंतवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इतर गुंतवणूकदारही सोन्यातील गुंतवणूक वाढविण्याची शक्यता आहे. त्या अवस्थेत सोन्याचे दर पुढील वर्षापर्यंत पंधरा टक्क्यांनी वाढू शकतात, असे त्यांनी सांगितले.