जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज नवव्या दिवशी बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यानंतर आज अॅथलेटिक्सकडे सर्वांचे लक्ष्य होते. अॅथलेटिक्समध्ये खेळाडूंनी चांगली कामगिरी सुरू ठेवली आहे.

अॅथलेटिक्समध्ये भारताच्या नीरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे. नीरजने 88.06 मी. भाला फेकत आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक प्राप्त करून दिले आहे. भालाफेक या क्रीडाप्रकारात भारताला आशियाई स्पर्धेत पहिलेच सुवर्णपदक मिळाले आहे.

याआधी धरूण आय्यासामी या भारतीय खेळाडूने 400 मीटर अडथळ्यांची शर्यत या क्रीडाप्रकारात दमदार कामगिरी करत दुसरे स्थान पटकावित भारताला रौप्यपदक जिकूंन दिले आहे. तर दुसरीकडे महिला स्टीपलचेस 3000 मी. या प्रकारात सुधा सिंग हिने दमदार कामगिरी करत रौप्यपदक पटकाविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)