दागिन्यांना हॉलमार्क बंधनकारक होणार

नवी दिल्ली – देशात विकल्या जाणाऱ्या सर्व सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक करण्याबाबत केंद्र सरकार गंभीरपणे विचार करित असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.

सध्या हॉलमार्क करण्याची मुभा दागिने उत्पादकांना देण्यात आले आहे. मात्र ते बंधनकारक नाही. या उपक्रमाला ग्राहकांना आणि दागिने उत्पादकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यामुळे या योजनेचे विस्तारीकरण करण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-

हॉलमार्क असल्यानंतर ग्राहकांना दागिने खात्रीने घेण्यास मदत होते. त्याचबरोबर या व्यवहारातील पारदर्शकता वाढते. भारतात सोन्याचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)