नकारात्मक जागतिक संकेतामुळे सोने-चांदीच्या दरात घट 

नवी दिल्ली: जागतिक व्यापारयुद्ध वाढत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर अस्थिर आहेत. त्याचबरोबर भाव वाढल्यामुळे स्थानिक पातळीवर मागणी कमी झाल्याने सोमवारी सोन्याच्या दरात 30 रुपयांनी घट झाली. चांदीला उद्योग क्षेत्राकडून मागणी कमी झाल्यामुळे चांदीचे दर 500 रुपयांनी कमी झाले. दिल्ली सराफात सोमवारी स्टॅंडर्ड सोन्याचे दर 30 रुपयांनी कमी होऊन 31720 रुपये प्रति दहा ग्रॅम तर शुद्ध सोन्याचे दर 30 रुपयांनी कमी होऊन 31870 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेले.
काल सोन्याचे दर 30 रुपयांनी वाढले होते. सोमवारी तयार चांदीचे दर 500 रुपयांनी कमी होऊन 39300 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 0.66 टक्‍क्‍यांनी तर चांदीचे दर 0.11 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे दिसून आले. त्याचा भारतीय बाजारावरही परिणाम झाला. अमेरिका आणि चीनने परस्पराच्या वस्तूवर जास्त आयात शुल्क वाढविण्याची पुन्हा धमकी दिली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सध्या संदिग्ध वातावरण आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)