पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तामिलनाडू दौऱ्यापूर्वी #GoBackModi हॅशटॅग ट्रेंड

भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत “फिर एक बार, मोदी सरकार’ हे घोषवाक्‍य निश्‍चित केले आहे. यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ‘बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ असा नारा भाजप सत्तेत आला होता. मात्र यंदाचा 2019 च्या लोकसभा निवडणुकी पुढे ट्विटरवर गो बैक मोदी (#GoBackModi)हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे भूमी पूजन कार्यक्रमानिमित्त तामिलनाडूच्या मदुरै दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी गो बैक मोदी (#GoBackModi)हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. गो बैक मोदी (#GoBackModi) या ट्रेडिंग हॅशटॅगला व्यगंचित्राद्वारे ट्विट केले गेले आहे. या ट्विट्समध्ये काही व्यंगचित्रांमध्ये मोदींना भगवा रंगाचे जॅकेटमध्ये दर्शविले आहे. तसेच तामिलनाडूतील सर्वसामान्य जनतेने सोशल माध्यमाद्वारे मोदी सरकारवर गो बैक मोदी (#GoBackModi) हा हॅशटॅगचा वापर करून निशाणा साधला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सरकारला याचा विपरीत परिणाम होण्याची चर्चा भारताच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये चोहीकडे सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)