गोव्याचे नवे मुखमंत्री प्रमोद सावंत

मध्यरात्री १ वाजून ४५ मिनिटांनी पार पडला शपथ विधी

पणजी – गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असणाऱ्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असणाऱ्या मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना जोरदार वेग आला होता.

मध्यरात्री १ वाजून ४५ मिनिटांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी ‘प्रमोद सावंत’ यांच्या हातात गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. तसेच, गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदीन ढवळीकर या दोघांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

प्रमोद सावंत हे आपल्या साधेपणासाठी परिचित असून, ते व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहे. प्रमोद सावंत हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सावंत हे मार्च २०१७ पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, यापूर्वी ते कधीही मंत्री झाले नाहीत. परंतु आता त्यांना थेट गोव्याचे मुखमंत्री बनण्याची संधी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)