गोव्याचा पर्यटन विषयक ‘मास्टर प्लॅन’ चार महिन्यात तयार करणार:

पर्यटन मंत्री आजगावकर यांची माहिती 
पणजी: गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी आज विधानसभेमध्ये बोलताना गोव्याच्या महत्वाकांक्षी पर्यटन विषयक ‘मास्टर प्लॅन’ विषयाबद्दल माहिती दिली. पर्यटन ‘मास्टर प्लॅन’ येत्या ३ ते ४ महिन्यांमध्ये तयार होणार असून हा प्लॅन बनवताना कोस्टल रेग्युलेशन झोन २०१८च्या मसुद्यात असणाऱ्या अटींचा विचार करण्यात आला आहे.
दरम्यान विरोधी पक्ष काँगेसकडून विधानसभेत राज्याच्या पर्यटन बाबतीतील ध्येयधोरणांबाबत प्रश्न उपस्थित केले असता आजगावकर यांनी मास्टर प्लॅन बनवण्यात उशीर झाला असल्याचे मान्य केले. “यापूर्वी पर्यटनाबाबत दिशादर्शक आराखडा बनवण्यात राज्यसरकारला उशीर झाला आहे. परंतु आता आम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित करून काम करत आहोत” असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)