स्वादुपिंडाच्या उपचारासाठी पर्रीकर अमेरिका दौऱ्यावर 

पणजी: स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेले गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री येत्या १० तारखेपासून अमेरिकेला जाणार आहेत. तत्पूर्वी ६४ वर्षीय पर्रीकर यांना याच वर्षी ७ मार्च पासून १४ जूनपर्यंत स्वादुपिंडाच्या उपचारांसाठी अमेरिकेतील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयातून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार पर्रीकर १० ऑगस्ट पासून १७ ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये उपलब्ध नसतील आज रात्रीच ते मुंबई येथून अमेरिकेकडे रवाना होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)