गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

पणजी – मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. मंगळवारी मध्यरात्री प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज सावंत यांना गोवा विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागलं.त्यानंतर आज गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री प्रमोद सावंत विधानसभेत विश्वासदर्शक ठराव देखील जिंकले.

विधानसभेत 20 आमदारांचा प्रमोद सावंत यांच्या सरकारला पाठिंबा भेटला. यामध्ये 11 भाजप, 3 गोवा फॉरवर्ड पक्ष, 3 महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, 3 अपक्ष यांचा समावेश होता.

दरम्यान, सभागृहात बहुमताचा प्रस्ताव सादर करत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत पर्रीकरांच्या आठवणीनं भावूक झाले.

गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची आज शक्तिपरीक्षा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)