व्यापार मेळाव्यामुळे ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ : सुभाष देसाई 

नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात हस्तकला, अभियांत्रिकी आदी उद्योगाने गती धरली असून आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या माध्यमातून या उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

नवी दिल्ली येथील प्रगती मैदान येथे आजपासून सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतिश गवई, संतोष कुमार आणि समीर सहाय यावेळी उपस्थित होते.

-Ads-

देसाई म्हणाले, उद्योग क्षेत्रात विविधता दिसून येते यात ग्रामीण उद्योगाने आपली वेगळी छाप सोडली आहे. ग्रामीण भागात हस्तकला आणि अभियांत्रिकी उद्योगांमध्ये गती घेतली आहे. आतंरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण उद्योजकांना जागतिक मंच उपलब्ध झाला आहे. यातून देश- विदेशातील व्यापा-यांशी थेट संवाद व व्यापाराची संधीच ग्रामीण उद्योजकांना उपलब्ध झाली आहे. या मंचासह राज्यातील ग्रामीण उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले.


टेक्‍सटाईल पार्कला प्रतिसाद 

राज्य शासनाने 10 टेक्‍सटाईल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अमरावतीमध्ये एक टेक्‍सटाईल पार्क उभारण्यात आला आहे. याला उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून गुंतवणूक वाढत आहे. तसेच या पार्कमुळे रोजगारातही वाढ झाल्याचे देसाई यांनी सांगितले. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात उर्वरीत टेक्‍सटाईल पार्क लवकरच उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)