येत्या 48 तासांत कोणत्याही क्षणी ‘इंटरनेट’ ठप्प होऊ शकते

नवी दिल्ली – संपूर्ण जगात इंटरनेटच्या वापरकर्त्यांना येत्या 48 तासात कोणत्याही क्षणी ‘नेटवर्क फेलयर’ अशा अडचणीचा सामना करावा लागू शकेल. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञाच्या माहितीनुसार, सायबर हल्ल्यापासून सुरक्षिततेसाठी जगात मुख्य  डोमेन सर्वरचे मेन्टेनन्सचे (देखभालीचे) काम केले जाणार आहे. त्यामुळे जगातील मुख्य डोमेन सर्वर मध्ये डाॅट काॅम, डाॅट इन, डाॅट अोआरजी इत्यादी संबंधित वेबसाइट डाउन (बंद) राहू शकतात.

-यांचा परिणाम डाॅट काॅम, डाॅट इन, डाॅट अोआरजी इत्यादी सर्व प्रकारच्या डोमेनशी संबंधित वेबसाईटवर पडू शकतो.
-क्रिप्टोग्राफिक-की मध्ये बदल करण्यात येणार आहे, त्यामुळे सायबर हल्ले रोखणे सोप्पे होईल आणि सायबर हल्ल्यापासून सुरक्षितता मिळेल.

-Ads-

जगातील बहुतेक वेबसाईट यामुळे काहीकाळ बंद पडू शकतात.

1. रूस येथील वृत्तपत्र रशिया टुडे यांच्या माहितीनुसार सर्व डोमेन सर्वरचे नेटवर्क इंन्फ्रास्ट्रक्चर दुरूस्त करण्यात येणार आहे. त्यादरम्यान काही वेळेकरिता जगातील बहुतेक वेबसाइट व्यवस्थितरित्या चालू शकणार नाही.

2. माहितीनुसार इंटरनेट काॅर्पोरेशन आॅफ असाइंड नेम्स अॅण्ड नंबर्स(आईसीएएनएन) मेन्टेनन्स दरम्यान क्रिप्टोग्राफिक-की मध्ये बदल करण्यात येणार आहे.

3. यामुळे इंटरनेट अॅड्रेस बुक आणि डोमेन नेम सिस्टम यांची सुरक्षा प्रणाली अधिक सुरक्षित राहील. तसेच यामुळे सायबर हल्ला झाला तर याचा परिणाम वेबसाइट वर होणार नाही.

4. आईसीएएनएन यांच्यानुसार सायबर हल्ल्यापासून सुरक्षिततेसाठी सर्वरचे मेन्टेनन्सचे काम करणे गरजेचे आहे. कम्युनिकेशनस रेग्युलेटरी अॅथोरिटी (सीआरए) ने स्पष्ट केले आहे की जर नेटवर्क आॅपरेटर आणि इटंरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर या बदलासाठी तयार झाले नाहीत तर त्यांच्या ग्राहकांना (यूजर) अडचण येऊ शकते.

5. आईसीएएनएन यांनी सांगितले की, इंटरनेट युजर्स यानंतर जुना आयएसपी वापरत असतील तर त्यांना आगामी 48 तासापर्यंत वेब पेज अॅक्सेस करताना किंवा कोणत्याही प्रकारचा आॅनलाइन व्यवहार करताना अडचण येऊ शकते.

What is your reaction?
52 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
3 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)