भारत किंवा इंग्लंड विश्‍वचषक जिंकेल – ग्लेन मॅकग्रा

चेन्नई – सध्या भारता मध्ये आयपीएलचे वारे वाहत असले तरी एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धेची उत्सुकता सर्वच क्रिकेट प्रेमींना असून यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोण पटकावणार या बाबद अनेक तर्क वितर्क लावले जात असून यंदाचा विश्‍वचषक भारत किंवा इंग्लंडचा संघ पटकावेल असे विधान ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्राने केले आहे.

यावेळी बोलतना मॅकग्रा म्हणाला की, आगामी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि इंग्लंड हे विजेतेपद जिंकू शकतील. गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला विजेतेपदावर नाव कोरता येईल, असे मत त्याने व्यक्त केले असून भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने विश्‍वचषकातील विजेतेपदाच्या आशा उंचावल्या आहेत, असे ही त्याने यावेळी नमूद केले.

इंग्लंड आणि भारत हे विश्‍वचषकातील दोन सर्वोत्तम संघ आहेत. वेस्ट इंडिजमध्ये इंग्लंडला झगडायला लागले, तर, भारताने ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करली. त्यामुळे या दोन संघांमधील रंगत अधिक वाढेल, असे देखील मॅकग्रा बोलताना म्हणाला.

त्यातच पुढे बोलताना तो म्हणाला की, इशांत शर्मा हा अतिशय अनुभवी गोलंदाज आहे. अनुभवी भुवनेश्वर कुमारनेही अप्रतिम गोलंदाजी करायला हवी. मोहम्मद शमी सध्या सातत्याने बळी मिळवत आहे. जसप्रीत बुमराकडे असामान्य गुणवत्ता असू यॉर्कर्स आणि रीव्हर्स स्विंग करण्याची क्षमताही आहे. त्यामुळे भारताला विश्‍वविजेतेपदासाठी गोलंदाजांनी कामगिरी उंचावण्याची आवश्‍यकता आहे,” असे मॅकग्राने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)