पहिल्या टप्प्यात 2 टीएमसी पाणी द्या

“पीएमआरडीए’ची जलसंपदा विभागाकडे मागणी

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यात जलसंपदा विभागाकडे 2 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. प्राधिकरणाच्या दक्षिण आणि उत्तर भागातील गावांसाठी या पाण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती “पीएमआरडीए’ आयुक्त किरण गित्ते दिली.

“पीएमआरडीए’ला पाणी पुरवठा करण्यासंदर्भात मध्यंतरी मुंबई येथे बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये सध्या 2 टीएमसी आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन 6 टीएमसी पाणी पुरवठ्याची मागणी “पीएमआरडीए’ने केली होती. त्यावर दोन्ही महापालिकांनी त्यांच्या मूलभूत पाण्याची गरज भागवून पाणी पुरवण्यात कशी बचत करता येईल, यांचे नियोजन करावे, तसा अहवाल तयार करून सादर करावा, असे त्या बैठकीत ठरले होते. त्यानुसार “पीएमआरडीए’ने दक्षिण भागातील वाघोलीपर्यंत, तर उत्तर भागातील म्हाळुंगेपर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी 2 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. दक्षिण भागासाठी भामा-आसखेड या धरणातून 1 टीएमसी पाणी मिळावे, असा पर्याय दिल्याचे आयुक्त गित्ते यांनी सांगितले.

वाहतूक सुधारण्याचे प्रयत्न

“पीएमआरडीए’ने आपल्या 7 हजार चौरस किलोमीटर हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम एल ऍन्ड टी कंपनीला दिले होते. या कंपनीकडून पहिल्या टप्प्यात 2 हजार चौरस किलोमीटर लांबीचा परिसराचा वाहतूक आराखडा तयार करून सादर केला आहे. त्यामध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुमारे 66 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेता येईल, असे प्रस्तावात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)