ऋषभ पंतकडेच यष्टिरक्षणाची जबाबदारी द्या – मो. अझरुद्दीन

कोलकाता: भारत विरुद्ध विंडीज दरम्यान झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात धोनीला विश्रांती दिल्यानंतर ऋषभ पंत कडे यष्टीरक्षनाची जबाबदारी असनार होती. मात्र, पहिल्या सामन्यात रोहित शर्माने दिनेश कार्तिककडे यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली होती. मात्र, रोहितच्या या निर्णायावर टिका करताना भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने दिनेश कार्तिकऐवजी ऋषभ पंतकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवावी असे मत व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना अझरुद्दीन म्हणाला की, ऋषभ पंतहा दिनेश कार्तिकपेक्षा सरस यष्टीरक्षक आहे आणि त्यालाच या मालिकेत यष्टिरक्षण करू दिले पाहिजे. जर पंत हा इंग्लंडमध्ये यष्टिरक्षण करू शकतो तर त्याला टी-20 सामन्यात देखील यष्टीरक्षण करू द्यायला हवे. त्याने इंग्लंडमध्ये कार्तिकपेक्षा सरस कौशल्य दाखविले होते. पंतमध्ये प्रचंड प्रतिभाशक्ती आहे. त्याला जेवढी जास्त संधी द्याल तेवढा तो त्यातून शिकत जाईल आणि त्याच्या कामगिरीत सुधारणा होईल. याचा फायदा निश्‍चीतच भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत होईल. त्यामुळे त्याला जास्तित जास्त यष्टीरक्षणाची संधी दिली जायला हवी असेही मत त्याने यावेळी मांडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याचसोबत अझरुद्दीने फिरकीपटू कुलदीप यादवचेही कौतुक केले आहे. कुलदीपने गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या कामगिरीत भरपूर सुधारणा केली आहे. तो कुप लवकर आपल्यामध्ये सुधारना करतो आहे. त्यामुळे आगामी काळात तो टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाजांपैकी एक असेल याचा मला विश्‍वास आहे. असेही त्याने यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)