दुष्काळी जनतेला वेळीच दिलासा द्या! : शरद पवार

शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना सूचविल्या 

मुंबई –
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने निश्‍चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि दुष्काळी जनतेला वेळीच दिलासा द्यावा, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यासंदर्भात पवार यांनी फडणवीस यांना पत्र लिहून दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना सूचविल्या आहेत.

राज्याच्या बहुतांश भागात पर्जन्यमान कमी झाल्याने ऐन हिवाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाने निराश केल्याने शेतक-यांच्या हातून खरीपाचे पीक गेले असून रब्बीची पेरणीही संकटात सापडली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चारा टंचाईमुळे पशुधनही धोक्‍यात आले आहे. त्यामुळे सरकारने यावर कृती कार्यक्रम हाती घ्यावा, असे पवार यांनी सूचविले आहे.

-Ads-

शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिताना दुष्काळी उपाययोजनाही सूचविल्या आहेत. त्यांनी दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांवर आक्षेप घेतला आहे. दुष्काळ जाहीर करण्याच्या कार्यपध्दतीमधील दोष दूर करून त्यात सुधारणा करावी, असे पवार यांनी म्हटले आहे. तालुक्‍यातील पावसाची सरासरी विचारात घेताना पावसाचे प्रमाण विचारात घेतलेले नाही.

परिणामी दुष्काळी तालुक्‍यात सरासरी पर्जन्यमान कमी असतानाही दुष्काळ जाहीर झाला नसल्याने अशा तालुक्‍यांवर अन्याय झाल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली आहे. ज्या तालुक्‍यात दुष्काळाची भीषणता आहे तेथे दुष्काळ जाहीर झालेला नाही अशा ठिकाणी त्रुटी दूर करून दुष्काळी तालुके घोषित करावेत. दुष्काळ जाहीर करताना मंडल ऐवजी तालुक्‍याची सरासरी विचारात घेणे चुकीचे आहे. दुष्काळ जाहीर करताना पैसेवारीबाबत गाववार वस्तुस्थिती लक्षात घेतलेली नाही, असे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

पवारांनी केलेल्या मागण्या… 

– सरकारने प्रत्येक दोन महिन्यातून एकदा उपसा सिंचन योजनेचे वीज बिल भरावे आणि दुष्काळी भागात पाणी उपलब्ध करून द्यावे. 
– अंतिम टप्प्यात असलेल्या सिंचना योजना तातडीने पूर्ण कराव्यात 
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकर्यांना हेक्‍टरी 25 हजार रूपये मदत करावी. 
– फळबागा वाचविण्यासाठी टॅंकरने पाणी देणे गरजेचे आहे. याआधी दुष्काळात मंजूर केल्यानुसार शेतकर्यांना हेक्‍टरी 50 हजाराची मदत द्यावी. 
– हुमणी रोगामुळे ऊस उत्पादनात घट झाल्याने शेतक-यांना हेक्‍टरी 50 हजार रूपयांची मदत करावी 
– दुष्काळी भागातील स्थलांतरीत कुटुंबांना फिरते रेशनकार्ड द्यावे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)