शांततेसाठी आणखी एक संधी द्या : इम्रानखान

कारवाईयोग्य पुरावे द्या लगेच कारवाई करतो

भारताने फेटाळले आवाहन

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इस्लामाबाद – भारताने पाकिस्तानला शांततेसाठी आणखी एक संधी द्यावी असे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी केले आहे. भारतातील हल्लेखोरांच्या संबंधात भारताने आम्हाला कारवाई योग्य पुरावे द्यावेत त्याच्यावर आम्ही लगेच कारवाई करू असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून त्यांनी हे निवेदन दिले आहे. त्यात इम्रानखान यांनी म्हटले आहे की, पुलवामा येथे जो हल्ला झाला त्याला जबाबदार असणाऱ्या गटांच्या संबंधात त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी आम्हाला सादर करावेत. जर त्यात तथ्य असेल किंवा ते पुरावे कारवाई योग्य असतील तर आम्ही त्यावर निश्‍चीत उपाययोजना करू असेही त्यांनी म्हटले आहे. पण त्याच वेळी भारताने हल्ल्याचा विचार करू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने इम्रान खान यांचे हे आवाहन धुडकाऊन लावले आहे. अशा लंगड्या सबबी त्यांनी पुढे करू नयेत असे भारताने म्हटले आहे. 26/11 ला मुंबईवर जो हल्ला झाला होता त्यावेळी भारताने पाकिस्तानला पुरावे दिले होते. पण त्यावर त्यांनी अजून काहीही कारवाई केलेली नाही. पठाणकोट हवाई तळावरही झालेल्या हल्ल्याच्या बाबतीतही भारताने पाकिस्तानला पुरावे दिले होते पण तेव्हाही पाकिस्तानकडून कोणतीही कारवाई झालेली नाही याकडे इम्रान यांचे लक्ष वेधले.

आपली मोदींशी डिसेंबर 2015 भेट झाली होती त्यावेळी मोदींनी आपण एकत्रपणे गरीबी विरूद्धची लढाई लढली पाहिजे, दहशतवादामुळे शांतता प्रक्रियेत बाधा येणार नाही याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे असेही मोदींनी म्हटले होते याकडेही इम्रान खान यांनी आपल्या निवेदनात लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)