सांगलीतील वालचंद कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या

सांगली/ प्रतिनिधी – सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेल मध्ये महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षता कोष्टी असे या युवतीचे नाव असून ती वालचंद कॉलेज मध्ये बीई सिव्हिलचे शिक्षण घेत होती.मात्र आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.या घटनेमुळे महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.
सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अक्षता कोष्टी या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.महाविद्यालयाच्या आवारातील हॉस्टेल मध्ये आज सकाळी अक्षता हिने आपल्या रूममध्ये पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.अक्षता ही मूळची जत तालुक्यातील डफळापुरची रहिवासी आहे.सध्या वालचंद कॉलेजमध्ये सिव्हिल प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होती.या निमित्ताने ती कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका रूम मध्ये पाच मैत्रिणीच्या सोबत राहत होती.आज सकाळी इतर मैत्रीणी कॉलेजला गेल्या. यानंतर काही मैत्रिणी पुन्हा रूमवर परतल्या त्यावेळी अक्षता ही पंख्याला लटकत असल्याचं आढळून आले. यानंतर हॉस्टेल मध्ये खळबळ उडाली. याबाबत कॉलेज प्रशासनाने विश्रामबाग पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. मात्र ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)