पुणे मतदारसंघात गिरीश बापटांची १५ हजार मतांनी आघाडी 

पुणे – पुणे लोकसभा मतदार संघातून 31 उमेदवार रिंगणात असले तरी, खरी लढत भाजपचे गिरीश बापट आणि कॉंग्रेसचे मोहन जोशी यांच्यात सुरु आहे.  गिरीश बापट यांनी १५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

गिरीश बापट यांना एकूण 30682 तर मोहन जोशी यांना  पारड्यात 14456 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांना 6131 मते मिळली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुरवातीपासून या मतदार संघात भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र बदलण्यात जोशी यांना काही प्रमाणात यश आले आहे. एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार पुण्यात भाजपचा उमेदवार विजयी होईल, असे जरी सांगत असले तरी मोहन जोशी हे “डार्क हॉर्स’ ठरू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)