बेगुसराईतून लढण्यास गिरीराजसिंह यांनी नकार देणे हे शाळेत जाण्यास नकार देणाऱ्या लहान मुलासारखेच : कन्हैयाकुमार याने उडवली खिल्ली

पाटणा – केंद्रीय मंत्री व भाजपचे बेगुसराईतील उमेदवार गिरीराजसिंह यांनी भाजप नेत्यांवर टीका करीत बेगुसराई मतदार संघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यांचा हा नकार म्हणजे गृहपाठ केला नाही म्हणून शाळेत जाण्यास नकार देणाऱ्या शालेय विद्यार्थ्या सारखेच आहे अशी खिल्ली या मतदार संघातील कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कन्हैयाकुमार याने उडवली आहे.

आपल्या फेसबुक पोस्टवर त्याने म्हटले आहे की हे केंद्रीय मंत्री नागरीकांना मोफत पाकिस्तानच्या टूरवर पाठवण्यास निघाले होते पण स्वत: मात्र बेगुसराईत येऊन निवडणूक लढवण्यास तयार नाहीत. मोदींना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे मी त्यांचा पाकिस्तानला पाठवण्याचा खर्च करीन असे विधान गिरीराजसिंह यांनी केले होते त्याचा संदर्भ देत कन्हैयाने म्हटले आहे की पण आता ते बेगुसराईला यायला घाबरत आहेत.

गिरीराजसिंह यांना नवादा मतदार संघातून उमेदवारी हवी होती पण भाजपने त्यांना बेगुसराईला पाठवले आहे. त्या विषयी गिरीराजसिंह यांनी भाजप नेतृत्वावरही चांगलेच तोंडसुख घेतले आहे. भाजपच्या अन्य कोणत्याही खासदाराचे मतदार संघ बदलले नाहीत माझाच मतदार संघ का बदलला असा सवाल त्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)