गदिमा यांचे सुपूत्र व ज्येष्ठ लेखक श्रीधर माडगूळकर यांचे निधन 

पुणे – महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा यांचे सुपूत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

श्रीधर माडगूळकर यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला. १९७० साली “जिप्सी” या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन करुन अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली. त्याच प्रमाणे “धरती” व साप्ताहिक “मायभूमी” या नियतकालिकांचा उपसंपादक म्हणून काम केले आहे.त्यांच्या अनेक कथा महाराष्ट्रातील प्रतिष्ठित नियतकालिकांमधुन प्रसिध्द झाल्या आहेत. “आठी आठी चौसष्ट” ही कादंबरी राजकीय कादंबरीत मैलाचा दगड समजली जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गदिमांच्या आठवणींवरील “मंतरलेल्या आठवणी” हे पुस्तक प्रसिद्ध, दै.लोकमत, दै.तरुण भारत या सारख्या अनेक वृत्तपत्रांमधून लेखन.५ व ६ जानेवारी २०१३ रोजी गोवा इथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आठव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,’अजून गदिमा’ हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे लवकरच प्रसिद्ध होत आहे. १९९७ साली इंटरनेटवर मराठी भाषेतील “जाळं” या पहिल्या साप्ताहिकाची सुरवात करुन याचे यशस्वी संपादन केले.

१९७५ पासून काँग्रेसचे क्रियाशील सदस्यत्व स्विकारुन त्या पक्षातर्फे १९८० व १९८५ साली विधानसभा निवडणुकीत सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)