विविध विकासकामांमुळे घारगावला गाडगेबाबा पुरस्कार-फटांगरे

संगमनेर – पठार भागातील जनतेने मला विश्वासाने निवडून दिले आहे. गेले एक वर्ष जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण बऱ्याच कामांना सुरुवात केली. घारगाव ग्रामपंचायतीच्या शेवटच्या टप्प्यात सदस्य मंडळाने गावात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली, सरपंच, उपसरपंच यांच्या प्रयत्नातून अनेक विकासकामे मार्गी लागली. यामुळे घारगावला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत तालुक्‍यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे यांनी दिली.

संगमनेर तालुक्‍यातील घारगाव येथे त्यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेलेल्या विविध विकासकामांच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी घारगाव पशुवैद्यकीय दवाखान्यात तीन लाख रुपये किमतीची सौर ऊर्जा, जनसुविधा निधीतून स्मशानभूमीत चार लाख रुपयांचे बसण्याचे शेड, घारगाव जिल्हा परिषद शाळेला 14 व्या वित्त आयोगातून चार लाख रुपयाची संरक्षक भिंत आदी कामांची उद्‌घाटने करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रसंगी सरपंच सुरेखा आहेर, उपसरपंच संदीप आहेर, संतोष शेळके, दैवत आहेर, अर्चना आहेर, सुरेश आहेर, सुहास आहेर, जगदीश आहेर, नामदेव गाडेकर, दादा पाटील आहेर, नितीन आहेर, वाल्मिक आहेर, राजेंद्र आहेर, प्रशांत कान्होरे, राजेंद्र कान्होरे, रुपाली कान्होरे, सुरेखा कान्होरे, संतोष नाईकवाडी, शकील मणियार आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)