राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी घनश्‍याम शेलार

श्रीगोंदा – भाजप-सेना युती झाल्यामुळे शिवसेना जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परतलेले, ज्येष्ठ नेते घनश्‍याम शेलार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेलार यांना नियुक्तीचे पत्र दिले. पक्ष वाढीसाठी व पक्षाचे ध्येयधोरण जन-माणसात पोहचविण्यासाठी आपली या पदावर निवड करण्यात येत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

या निवडीबद्दल शेलार यांचे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी स्वागत केले. या निवडीनंतर शेलार म्हणाले, शिवसेनेकडून जनतेला खूप अपेक्षा होत्या, मात्र त्या एका निर्णयामुळे मावळल्या आहेत. आगामी काळात पक्ष संघटना बजबूत करण्यासाठी आणि विशेष करून नगर दक्षिणचा खासदार निवडणूक आणण्यासाठी पक्षाने आपणावर मोठी जबाबदारी दिली असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)