शिरूर – शिरूर तालुक्यातील फाकटे गावात विहीरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आहे. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या बिबट्याला जीवदान दिले आहे. यासंदर्भात माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राचे अधिकारी अजय देशमुख यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे.