पाकिस्तानशी क्रिकेटच्या मैदानात भिडून त्यांना मात द्या- गावस्कर

नाही खेळल्यास त्यांना फुकटचे दोन गुण मिळतील

नवी दिल्ली: क्रिकेट विश्‍वचषकात पाकिस्तान विरुद्ध जर भारतीय संघ खेळला नाही तर भारतीय संघाला पराभूत घोषित केले जाईल आणि पाकिस्तानला फुकटात दोन गुण बहाल केले जातील.  विश्वचषकात पाकिस्तानला बहिष्कृत करून भारताचं नुकसान होईल. त्याऐवजी पाकिस्तानशी क्रिकेटच्या मैदानात भिडून त्यांना मात देत त्यांचं नुकसान करणं भारताच्या हिताचं आहे, असं मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलंय.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका मुलाखतीत गावस्कर म्हणाले की, विश्‍वचषक स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत जवळपास प्रत्येक वेळी पाकिस्तानला हरवले आहे. त्यामुळे जर आपण त्यांना हरवले तर आपल्याला दोन गुण मिळणार आहेत. म्हणजेच पाकिस्तान दोन गुणांअभावी स्पर्धेत आगेकूच करु शकणार नाही. अर्थात मी देशासोबतच आहे. सरकारने जर ठरवले की पाकिस्तानसोबत खेळायचे नाही तर मी सरकारसोबतच आहे.’ पाकिस्तानविरुद्धचे सामने न खेळून ते दोन गुण गमावूनही पात्र ठरण्यास भारत समर्थ आहे. पण त्यांच्याशी मैदानावर दोन हात करत ते पात्र ठरणार नाहीत याची तजवीज करणे अधिक गरजेचे आहे, असे गावस्कर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)