कंगणासोबतचे सगळे मतभेद मिटवण्यास करण तयार

आज देशभर कंगणा राणावतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ प्रदर्शित झाला आणि दुसरीकडे कंगणासाठी एक मोठी बातमी आली. करण जोहरने ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’च्या रिलीजदरम्यान कंगणापुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. करण सगळे मतभेद, वाद विसरून कंगणासोबत काम करण्यास तयार झाला आहे. करण अलीकडे एका मुलाखतीत कंगणाबद्दल बोलला. मला कंगणासोबत काम करण्यास काहीही अडचण नाही.

तिच्यासोबत काम करायला मला आवडेल. मी आत्तापर्यंत जितके काही चित्रपट दिग्दर्शित केले, त्यात कंगणालायक भूमिका नव्हती. उरली गोष्ट मी निर्मिती केलेल्या चित्रपटाची. तर आजपर्यंत कुण्याही दिग्दर्शकाने माझ्याकडे या चित्रपटांसाठी कंगणाचे नाव पुढे न केल्यामुळे माझ्या चित्रपटांत कंगणा दिसली नाही. आमच्यात मतभेद आहेत, याचा अर्थ आम्ही एकमेकांसोबत काम करणार असा नाही, असे करण यावेळी म्हणाला. बॉलिवूडमधील वशिलेबाजीच्या मुद्दयावरून या दोघांमध्ये काही काळापूर्वी जोरदार शीतयुद्ध भडकले होते. करण जोहर, वरुण धवन आणि हृतिक रोशन या तिघांनीही कंगणाविरोधात आघाडीच उघडली होती. करण आणि वरुणने तर ऍवॉर्ड शो दरम्यान कंगणाला उद्देशून शेरेबाजीही केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)