फिफा विश्वचषक : जर्मनीवरील विजयाने कोरियात आनंदोत्सव

सेऊल: अखेरच्या गटसाखळी लढतीत जर्मनीवर सनसनाटी मात करून गतविजेत्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आणण्याचा पराक्रम दक्षिण कोरियाने केला. कोरियाला बाद फेरीत स्थान मिळविता आले नसले, तरी या अफलातून विजयामुळे संपूर्ण कोरियात आनंदोत्सव सुरू झाला आहे. तसेच कोरियातील प्रसारमाध्यमांनी आपल्या संघावर प्रशंसेचा वर्षाव केला आहे.

चार वेळचे विजेते आणि चार वेळा उपविजेते असा देदीप्यमान इतिहास असलेल्या जर्मनीची वाटचाल या वेळी साखळीतच संपुष्टात आली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मेक्‍सिकोकडून झालेला पराभव त्यांना चांगलाच महागात पडला. स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यातही गतविजेत्या जर्मनीवर पराभवाची नामुष्की ओढवली. कोरिया संघाकडून जर्मनी 2-0 ने पराभूत झाला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान समाप्त झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोरियातील प्रसारमाध्यमांमध्ये संघाचे कौतुक करण्यासाठी चढाओढ चालू झाली आहे. सेऊलमधील डॉंग-ए या प्रमुख वृत्तपत्राने यात आघाडी घेतली असून “आम्ही बाद फेरी गाठली नाही, पण जगातील अव्वल संघाचे आव्हान संपुष्टात आणले’ असा मथळा दिला आहे. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, असेही डॉंगने म्हटले आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली नाक येऊन यांनी ट्‌विटरवरून संघाचे कौतुक केले आहे. “कल्पनाशक्‍तीवर आज वस्तुस्थितीने मात केली आहे’, असे ट्‌विट त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)