वनेश्वर – हाॅकी विश्वचषकामद्ये दोन वेळा विजेता राहिलेल्या जर्मनी संघाने बुधवारी गेल्या वर्षीच्या उपविजेत्या नेदरलँड्स संघावर 4-1 ने मात करत हाॅकी विश्वचषक स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मधील जागा जवळपास निश्चित केली आहे.
जर्मनी संघाकडून मैथियस मुलर (30 मि.), लुकास विंडफडर (52 मि.), मार्को मिल्टकाउ (54 मि.) आणि क्रिस्टोफर रूहरेन (58 मि.) गोल केले. पराभूत संघाकडून वेलेंटाइन वर्गाने 13 व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
स्पर्धेतील जर्मनी संघाचा हा दुसरा विजय ठरला. पहिल्या लढतीत जर्मनीने पाकिस्तान संघाचा 1-0 ने पराभव केला होता. या विजयासह जर्मनीचा संघ सहा गुणासह आपल्या गटात अव्वलस्थानी आहे. तर नेदरलँड्स संघाचे 3 गुण आहेत. यापूर्वी नेदरलँडस् संघाने मलेशियाचा 7-0 असा पराभव केला होता.
.@DHB_hockey come from the behind to beat @oranjehockey with a dominating 4-1 margin to top the POOL D following the battle of the heavyweights at the OHMWC Bhubaneswar 2018 on 5th December. #IndiaKaGame #HWC2018 #DilHockey #GERvNED pic.twitter.com/mrvKp2ABxm
— Hockey India (@TheHockeyIndia) December 5, 2018
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा