जेरार्ड पिके होतोय आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्त

फुटबॉल क्लब बार्सेलोना संघाचा महत्वाचा खेळाडू आणि २०१० विश्वचषक विजेत्या स्पेन संघाचा खेळाडू जेरार्ड पिके याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. स्पेनच्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली असली तरी तो व्यावसायिक फुटबॉल खेळणार आहे.

बार्सेलोना विरुद्ध सिव्हिला यांच्यात होणाऱ्या स्पॅनिश सुपर कपच्या पत्रकार परिषदेमध्ये निवृत्तीबाबतची अधिकृत घोषणा केली. त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावर आणि स्पॅनिश संघाच्या खात्यावरून देखील याबाबत आणखी काही बोलले गेले नाही.

या पत्रकार परिषदेमध्ये पिके म्हणाला, एक दोन आठवड्यापूर्वी लुईस एनरिके यांच्याशी माझे बोलणे झाले त्यांनी मला निवृत्तीचा निर्णय घेऊ नको असे सांगितले होते पण माझा अगोदरच निर्णय झाला होता.”

जेरार्ड पिके याने १०२ आंतरराष्ट्रीय सामन्यात स्पेनच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले आहे. तो त्याच्या खाजगी आयुष्यासाठी देखील खूप चर्चेत असतो. प्रसिद्ध कोलंबियन गायिका शकिरा त्याची पत्नी आहे. स्पेनपासून बार्सेलोना वेगळे व्हावे वा वेगळा कॅटलान देश व्हावा या मागणीचे त्याने अनेकदा समर्थन केले आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुक आणि नाराजी दोन्ही  वेळोवेळी व्यक्त झालेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)