जेनेलिया-रितेश पुन्हा एकत्रित झळकणार

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही जोडी पुन्हा एकादा मोठया पडद्यावर झळकणार आहे. हे दोघेजण चार वर्षानंतर परत एकत्रित काम करणार आहेत. बॉलीवुडमधील ही सुपरहिट जोडी आगामी “मौली’ या चित्रपटातील होळीवर आधारित असलेल्या “धुवुन ताक’मध्ये दिसणार आहे. या गाण्याचा एक व्हिडिओ रितेशने ट्‌विटरवर शेअर केला आहे.

बॉलीवुडमधील रितेश आणि जेनेलियाची जोडी लवकरच प्रदर्शित होणा-या “मौली’ या चित्रपटातील एका गाण्यात रोमांस करणार आहे. रितेशने रविवारी आपल्या चाहत्यांसाठी जेनेलियासोबत गाण्याची एक क्‍लिप शेअर केली आहे. यासोबत जेनेलियाची स्तुती करत त्याने ट्‌वीट केले की, “नवीन गाणे प्रसिद्ध झाले आहे. “धुवुन ताक’मध्ये तब्बल चार वर्षानंतर माझी बायको जेनेलियासोबत काम केले आहे. आजही तिचा जादु पूर्वीप्रमाणेच प्रेक्षकांवर दिसून येत आहे.

-Ads-

दरम्यान, जेनेलिया चार वर्षांपूर्वी रितेशच्या पहिला मराठी चित्रपट “लय भारी’मध्ये गेस्ट अपियरेंस म्हणून झळकली होती. “तेरे नाल लव हो गया’, “तुझे मेरी कसम’ आणि “मस्ती’ यासारख्या चित्रपटात एकत्रित काम केलेल्या रितेश-जेनेलियाने 2012मध्ये लग्न केले होते. त्यांना रियान आणि राहील अशी दोन मुले आहेत. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित “मौली’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)