गाझा पट्टयात इस्रायलकडून मारा 

संग्रहित छायाचित्र

जेरूसलेम, (इस्रायल) – पॅलेस्टाईनमधून इस्रायलच्या रहिवासी भागात रॉकेट हल्ले झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून गाझा पट्टयात जोरदार रॉकेट हल्ले केले. हमासच्या सर्वोच्च नेत्याच्या कार्यालयालाही या रॉकेट हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले.

बहुतेक मोठ्या शहरांमध्ये इस्रायलने शरणार्थ्यांसाठीच्या छावण्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण इस्रयलमधील नागरी संरक्षण विभागांनी सर्व क्रीडा स्पर्धा, सार्वजनिक वाहतुक सेवा रद्द केल्या आहेत. इस्रायलच्या आतमध्ये किमान 30 रॉकेट डागली गेली आहेत. दक्षिण इस्रायलमध्ये सोमवारी रात्री ही रॉकेट डागली गेली. बहुतेक रॉकेट हवेतच अडवण्यात आली किंवा मोकळ्या मैदानात पडली, असे इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशा प्रकारचा हल्ला इस्रायल कधीही सहन करणार नाही, असे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या चर्चेदरम्यान म्हटले आहे. इस्रायलनेही गाझा पट्टयात 15 ठिकाणी रॉकेट हल्ले केले. त्यात हमास या जिहादी गटाचे कार्यालयही उद्‌ध्वस्त झाले. गाझामध्ये झालेल्या हल्ल्यात हमास गुप्तचर संस्थेचे मुख्यालयही उद्‌ध्वस्त झाल्याचे इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)