स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघात नसणे ही आमची चूक नाही – गावसकर

सिडनी – भारतीय संघाने मालिकेत विजय मिळवला असला तरी भारतीय संघाचे श्रेय कमी करण्यासाठी काही ऑस्ट्रेलियाचे जाणकार हे स्मिथ आणि वॉर्नर यांच्या गैरहजेरीचे कारण देत आहेत.

यावर टीका करताना माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी म्हटले आहे की, वॉर्नर आणि स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या संघात नसणे यात भारतीय संघाची काहीही चूक नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ त्या दोघांच्या शिक्षेचा कालावधी कमी करु शकले असते. परंतु, त्यांना एक वर्षाचे शिक्षा देणे त्यांना योग्य वाटले. भारतीय संघासमोर जो ऑस्ट्रेलियाचा संघ सादर करण्यात आला त्याच्यासह भारतीय संघाने सामने खेळले आणि जिंकले. त्यामुळे ही भारतीय संघासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असेही गावसकर यावेळी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)