गौतम नवलखा यांच्या याचिकेवर 8 आठवड्यात सुनावणी व्हावी 

सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश

नवी दिल्ली – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील नागरी हक्क विषयक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल 8 आठवड्यांच्या आत द्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणी 2017 साली दाखल करण्यात आलेली “एफआयआर’ रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका नवलखा यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

दिल्ली उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांविरोधात महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या दोन आव्हान याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित ठेवल्या आहेत. नवलाखा यांच्या प्रलंबित याचिकांवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने वेगाने पूर्ण करावी आणि 8 आठवड्यात या याचिकेवर निर्णय द्यावा, असे निर्देश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पिठाने दिले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)