‘पत्नीला परेदश दौऱ्यावर सोबत नेऊ द्या’ या विराटच्या मागणीवर गंभीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली – भारतीय खेळाडूंना पूर्ण परदेश दौऱ्यादरम्यान पत्नीला सोबत नेण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती भारतीय कर्णधार विराट कोहली यांने भारतीय नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली आहे. परंतु सध्याच्या धोरणानुसार परदेश दौऱ्यात खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ हे दोन आठवड्यापर्यंतच पत्नीसोबत राहू शकतात.

हा नियम खेळाडूंना नाराज करणारा आहे असे विराटचे मत आहे. विराटने याबाबत बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत चर्चा केल्याचे समजते आहेत. या नियमाबदल क्रिकेट क्षेत्रात अनेक मतभेद आहेत. तसेच प्रत्येक देशांचे याबाबत वेगळे नियम आहेत. याबाबत आता भारतीय संघाचा खेळाडू गौतम गंभीर याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

गौतम गंभीरने म्हटलं आहे की, ‘पत्नीला परदेश दौऱ्यावर घेऊन जावे की नाही, हे पूर्णपणे भारतीय खेळाडूंवर अवलबूंन आहे’. यादरम्यान हे पण पाहणे गरजेचे आहे की, ‘खेळाडू मैदानांवर स्वत:च्या चांगल्या कामगिरीने स्वत:ला सिद्ध करू शकत आहेत की नाही. जर ते चांगली कामगिरी करत असतील तर पत्नीला सोबत नेण्यास काय हरकत आहे. असे गौतम गंभीरने म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)