गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाला सुनावले

नवी दिल्ली – अंबाती रायडू याला यो-यो परिक्षेत अयशस्वी ठरल्याने भारतीय संघाच्या बाहेर ठेवण्यात आलेे. यामुळे भारतीय खेळाडू गौतम गंभीर याने भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाला सुनावले. गौतम गंभीर याने म्हटले की, अंबाती रायडू सारखा कोणताही खेळाडू जर फिटनेसमुळे संघातून बाहेर होत असेल तर खेळाडूंच्या देखभालीची जबाबदारी ही संघाच्या फिटनेस ट्रेनरची आहेत.

गौतम गंभीरने पुढे बोलताना म्हटले की, भारतीय संघात खेळाडूची निवड ही त्याच्या कामगिरीच्या गुणवत्तेवर झाली पाहिजे.  फिटनेसच्या यो-यो परिक्षेच्या गुणवत्तेवरून काही खेळाडूंना भारतीय संघातून वगळण्यात आले होते. याबाबत  एका कार्यक्रमा दरम्यान गंभीरने यो-यो परिक्षेवर टीका केली.

अंबाती रायडू याची आयपीएलमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर भारतीय संघात निवड करण्यात आली होती. मात्र यो-यो टेस्टमध्ये अयशस्वी झाल्याने त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. याआधीही अनेक खेळाडूंनी या मुद्दयावरून बीसीसीआय वर टीका केली होती. आता गौतम गंभीर याने अशाप्रकारे निवड करण्याच्या प्रकाराला चुकीचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)