महामार्गवरील गौरीशंकर स्काय वॉकचे काम रखडले

अपघाताचा धोका, तातडीने काम सुरु करण्याची मागणी

सातारा  – पुणे बंगलोर महामार्ग सातारा नजीक गौरीशंकर नॉलेज सिटीजवळ उभारण्यात येत असलेला स्काय वॉकचे काम पूर्णात्वाकडे जात असतानाच ते रेंगाळले आहे. यामुळे विद्यार्थ्याच्या सुरक्षिताचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या महामार्गवर वाहनाची ये-जा मोठया प्रमाणात असून स्कायवॉक त्वरीत पूर्ण होणे आवश्‍यक आहे.भविष्यातील धोका ओळखून रस्ते विकास महामंडाळाने रेंगाळलेले काम त्वरीत सुरु करावे अशी मागणी जोर धरत आहे.

महामार्गवरील स्काय वॉक उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी विशेष पुढाकार घेवून गौरीशंकर स्काय वॉकला मंजूरी दिली आहे. पूणे बंगलोर महामार्ग अशा प्रकारचा स्काय वॉक प्रथमच उभा राहात आहे हे विशेष आहे. महामार्गावरील धोका लक्षात घेता खा. उदयनराजे भोसले,गौरीशंकर नॉलेज सिटीचे चेअरमन मदनराव जगताप प्रशासन,अधिकारी नितिन मुडलगीकर यानी सातत्याने पुढाकार घेत या स्काय वॉकला गती दिली.परंतू जवळपास 90 लाखापर्यंतचे काम झाल्यानंतर उर्वारित काम रेंगाळले आहे.

महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी महामार्ग मोठ्या प्रमाणात ओलांडताना दिसून येतात यामुळे अपघात घडण्याची शक्‍यता अधिक असते. अपघात घडू नये यासाठी स्काय वॉक काम त्वरीत होणे गरजेचे आहे. सध्या निधीअभावी हे काम रखडले असून यामुळे विद्यार्थ्याच्या सुरक्षितेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे,अशी माहिती गौरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)