गौरव गिलचा एमआरएफ रॅली ऑफ कोएम्बतूर राऊंड 2 मध्ये विजय

कोएम्बतूर: गौरव गिल आणि अमित्रजित घोष यांनी इतर चालकांहून चांगली कामगिरी करत टीम महिंद्रा ऍडव्हेंचरचे चालक एमआरएफ एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली अजिंक्‍यपद 2018 च्या एमआरएफ रॅली ऑफ कोएम्बतूर राऊंड 2 मध्ये विजय मिळवला आहे. गिल आणि त्याचा सहचालक मुसा शेरीफ यांनी प्रत्येक स्टेजमध्ये चमक दाखवली. त्यांना पाच विशेष स्टेज पूर्ण करण्यासाठी 1:14:30.1 वेळेची गरज होती. त्यांनी 1 मि.1.1 सेकंदच्या अंतराने विजय मिळवला.त्याचा संघसहकारी अमित्रजित (सह-चालक अश्‍विन नाईक) याने देखील रॅलीमध्ये चमक दाखवली. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना दुसरे स्थान मिळवले. तो अवघ्या 10 ते 15 सेकंद अंतराने मागे राहिला.

आयएनआरसीचा 2016 चा चॅम्पियन कर्ण कदूर (निखिल व्ही.पै सोबत) याने आयएनआरसी गटात आघाडी घेतली. दुस-या स्थानावर देखील आर्का मोटरस्पोर्टसने बाजी मारली.पण, ओव्हरऑल विभागात तो तिस-या स्थानावर राहीला. त्याचा संघसहकारी राहुल कांथराज (विवेक वाय भट्ट सोबत) दुसरे तर, फाल्गुना उर्स (श्रीकांत गोवडा , स्नॅप रेसिंग) याने तिसरे स्थान पटकावले.
आयएनआरसी 3 गटात गुणतालिकेत फारसा बदल पहायला मिळाला नाही. अरुर विक्रम राव (आनंद सोमय्या, फाल्कन मोटरस्पोर्टस) सहज विजय मिळवला. सुहेम कबीर (जीवराथिनम, टीम चॅम्पियनशिप) व चेतन शिवराम (रुपेश कोलेसह) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले. आयएनआरसी 3 मधील गतविजेते डिन मॅस्के-हेनस यांना पहिल्या दिवशी दुसरी स्टेज संपविता आली नाही त्यामुळे त्यांना गुणतालिकेत मागे पडले व त्यांना सहाव्या स्थानी जावे लागले.

-Ads-

माझ्या कामगिरीने मी समाधानी आहे. संघाने देखील दोन्ही दिवस चमकदार कामगिरी केल्याचे गिल म्हणाला.एफएमएससीआय अध्यक्ष अकबर इब्राहीम यांनी आयएनआरसी 1 गटात तिसरे स्थान पटकावले. तब्बल 25 वर्षांनी सहभाग नोंदवत इब्राहीमने चमक दाखवली.

निकाल – आयएनआरसी : 1) गौरव गिल/मुसा शेरीफ (टीम महिंद्रा ऍडव्हेंचर, 01:14:30.1) 2) अमित्रजित घोष/ अश्‍विन नाईक (टीम महिंद्रा ऍडव्हेंचर, 01:15:31.2) 3) कर्ण कदूर/ निखिल व्ही.पै (आर्का मोटरस्पोर्टस. 01:16:24.8)

आयएनआरसी 2 : 1) कर्ण कदूर/ निखिल व्ही.पै 2) राहुल कांथराज/विवेक वाय भट्ट ( आर्का मोटरस्पोर्टस 1:17:36.9), 3) फाल्गुना उर्स/श्रीकांत गोवडा, स्नॅप रेसिंग 01:17:40.7)

आयएनआरसी 3 : 1) अरुर विक्रम राव/ आनंद सोमय्या (फाल्कन मोटरस्पोर्टस, 01 :17:11.8) 2) सुहेम कबीर/जीवराथिनम (टीम चॅम्पियन्स, 01:17:48.8) 3) चेतन शिवराम/ रुपेश कोले 01:17:58.4)
एफएमएससीआय टू डब्ल्यु डी : 1) अदिथ केसी/सुरज के 2) सुरज थॉमस/ सोब जॉर्ज 3)लोकेश गोवडा व्ही/ वेनु रमेश कुमार

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)