‘येथे’ चालू होणार गौ-सफारी

संग्रहित फोटो
राजस्थान: राजस्थानमधील हिंगोनिया गावातील गौ-शालेने एक आगळा वेगळा प्रयोग हाती घेतला आहे. हिंगोनिया गौ-शाळेत १२ एकरांमध्ये देशातील पहिला ‘गौ-सफारी’ प्रयोग सुरु करण्यात आला असून यामध्ये लोक गायींच्या पाठीवर जुपलेल्या बैलगाड्यांमधून सफारी घेऊ शकणार शकणार आहेत.
 १२ एकरांंवर पसरलेल्या या गौ-सफारी प्रयोगाची मातीचे रस्ते, पाण्याचे पाट अशा नैसर्गिक ठेवनीने सुशोभिकरण करण्यात येणार आहे त्याचबरोबर परिसरातील झाडांवर गायींची विविध जातींची माहिती देखील दिली जाणार आहे.  गौशालेतील २२००० गायींपैकी २०० ते ३०० गायींना सफारी मार्गावर ठेवण्यात येईल. जन्माष्टमीचे औचित्य साधून या नाविण्यपूर्ण प्रयोगाची सुरुवात करण्यात येणार आहे.
दरम्यान हिंगोनिया या गौशालेत २०१६ मध्ये हजारो गायी मृत्यू मुखी पडल्या होत्या. राजस्थान सरकारच्या गलथान कारभारामुळेच गायींंचा मृत्यू झाल्याचे आरोप देखील सरकारवर लावण्यात आले होते यानंतरच हि गौशाला अक्षयपत्र फौंडेशन या संस्थेस देखभाली साठी देण्यात आली होती.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)