ट्विटरवर #GetWellSoonRahul ट्रेंडिंग; वाचा काय आहे ‘हा’ ट्रेंड

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची विधानसभा परिसरामध्ये भेट घेतली होती. पर्रीकरांसोबतच्या या बैठकीनंतर राहुल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना पर्रीकर यांनी आपल्याला, “मोदींनी मित्राच्या फायद्यासाठी केलेल्या नव्या राफेल कराराबत माहिती नाही.” असं सांगितल्याचे म्हंटले होते. मात्र आज गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी “राहुलबरोबर आपले राफेलबाबत कोणतेही संभाषण झाले नसून, राहुल या भेटीतून राजकीय स्वार्थ साधू इच्छित आहेत.” असं वक्तव्य केल्याने राहुल यांच्या कालच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दरम्यान, राहुल यांनी पर्रीकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेवरून केलेल्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी चांगलाच निशाणा साधला असून ट्विटरद्वारे राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात #GetWellSoonRahul हा ट्रेंड सुरु झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)