कोल्हापूरमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा – खासदार संभाजीराजे

कोल्हापूर – कोल्हापूरकरांना येत्या काही वर्षात पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा होणार आहे. केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत कोकणातील दाभोळ पासून कर्नाटकातल्या बंगळुरूपर्यंत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे राज्यसभेचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे कोल्हापूरसाठी आग्रह धरल्यावर केंद्र सरकारने या योजनेतील एक टप्पा कोल्हापूरला देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

त्यानुसार आता कोल्हापूरकरांना निम्म्या किमतीत गॅस मिळणार आहे. या योजनेचे काम 6 मार्चपासून सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात 15 हजार कनेक्‍शन देण्यात येणार आहे. येत्या काही वर्षात जवळपास 40 हजार कनेक्‍शन्स कोल्हापूरमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. या प्रकल्पाचे काम 2023 पर्यंत पूर्ण होणार असून कोल्हापूर शहरानंतर जिल्ह्यातील इतर शहरांना आणि गावांनाही पाइपलाइनद्वारे गॅस पुरवला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)