घोगरगावमध्ये उज्ज्वला गॅसचे वाटप

मांडवगण – केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेतुन घोगरगाव येथील महिलांना सरपंच बाळासाहेब उगले यांच्या हस्ते गॅसचे वाटप करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील महिलांची धुराची चूलीपासून मुक्‍तता व्हावी, त्यांची श्‍वसन यंत्रणा सुरक्षित राहावी व पर्यावरणाचे रक्षण होऊन त्याचा समतोल राहावा, वृक्षतोड थांबावी. यासाठी महिलांना मोफत गॅस कनेक्‍शन सर्व साहित्यासह मोफत देण्याची योजना ग्रामीण भागात चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

-Ads-

याच योजनेतुन घोगरगाव येथील महिलांना साईनाथ गॅस एजन्सी यांच्यामार्फत उगले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमास लाभधारक महिला, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या योजनेचा प्रत्येक पात्र महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन उगले यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)