एक कोटी ग्राहकांनी स्वेच्छेने सिलिंडर्सवरील अनुदान सोडले

file pic

नवी दिल्ली -पंतप्रधानांच्या गिव्ह इट अप मोहिमेला प्रतिसाद देत देशातल्या 1.3 कोटी लोकांनी स्वेच्छेने घरगुती गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या अनुदानाचा त्याग केला आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत दिली.

अनुदानाच्या दरात सुसूत्रीकरण अथवा बदल करण्याचा कुठलाही प्रस्ताव सरकारसमोर विचाराधीन नाही, असेही प्रधान यांनी स्पष्ट केले. जगातल्या नैसर्गिक, वायूच्या किमतीनुसार देशातही घरगुती गॅसच्या दरात बदल होत असतात. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना पहल योजनेअंतर्गत हे अनुदान दिले जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्राहकांनी विनाअनुदानित सिलिंडर खरेदी केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते, असेही त्यांनी सांगितले. 1 एप्रिल 2018 पर्यंत देशाच्या 89.5 टक्के भागात घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण झाले आहे, असेही प्रधान
यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)